Tuesday, February 27, 2018

मराठी भाषा दिन


भाषा हे व्यक्तं होण्याचं एक साधन आहे.
एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यन्तं विचार पोचवण्याचं एक माध्यम आहे.. !!

भाषा ही मानवाची गरज आहे, पण कोणती भाषा चांगली हा प्रश्नच मुळात गौण आहे..!!
ज्याला ज्या भाषेत व्यक्त होता येतं त्याने त्या भाषेत व्यक्तं व्हावं!!

"आपली ती चांगली, अन त्यांची ती वाईट" या केविलवण्या विचाराला विसरुन जावं !!
भाषेचा हेतु कधी विसरु नये, आणि कोणती ही असो, ती वापरणाऱ्या माणसाला कधी कमी लेखु नये!!

भाषा असते मानवासाठी, तुमच्या आमच्या वापरासाठी...
पडू नये विसर तयाचा, मानव आहे तोवरच असे भाषा!!!

मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा
©️अमेय गोखले