Saturday, May 12, 2018

हॉटेलिंग!!

हॉटेल मध्ये जाऊन खाणं याला हल्लीच्या काळात अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालय. कुठलाही आनंद सोहळा हा फक्त हॉटेलात जाऊनच करता येतो,.. आणि दुसऱ्या कुठल्याही प्रकारे करणे हा केवळ "चिपो" असण्याचा दाखला आहे असा कहीसा समज झलेला दिसतोय. पुण्यात तर म्हणे वीकएंडला चूल पेटंट नाही !! एवढं सगळं करून हॉटेल मध्ये जाऊन बघायचं तर तेच तेच सगळं.. त्याच नळ सोडून घातल्यागत ४ वेगवगेळ्या "ग्रेव्ही".. त्याच्यावरून घातलेले कुठले तरी भाज्यांचे प्रकार. .. रोटी - नान वगरे ठरलेले पदार्थ. .. एकूणच हॉटेलिंग हा एक्सपीरियन्स म्हणून बर्यचदा अपेक्षाभंग असतो. भारताबाहेरच्या "इंडियन रेस्त्रॉं" मधेही सधरण तसच..(काही अपवाद सोडुन!!)

पण हॉटेल मध्ये जाण्याची इच्छा नक्की का होते आपल्याला.?? अशी काय करणं आहेत  कि ज्यामुळे हे सगळं माहिती असूनही आपण परत परत जातो. ??  घरच्या अन्नाचा कंटाळा.. रुटीन मधला बदल वगरे नेहेमीची कारणं, ही वर वर ठीक वाटतात. पण त्या सगळ्याच्या खाली, कुठे तरी खोलवर .. एक विचित्र मिश्रण तयार झालंय ... बघा पटतंय का  .. 

१. आपल्या कडे स्वयंपाक हा पूर्वापार स्त्रियांच्या मक्तेदारीचा विषय झालाय. एखाद्या घरात आई-बाप आणि दोन मुले असतील तर आई सोडून कुणालाही स्वयंपाक फारसा येत नसतो. कधीकाळीं गरज पडली तर बाबा भात लावतात.. थोडेफार "बाबा" एखादी भाजी करतात .. काहीच नाही तर शेवटचा पर्याय म्हणजे "म्याग्गी" :(  पूर्ण स्वयंपाक (भात भाजी पोळी कोशिंबीर - व्हेज नॉन व्हेज) हे सगळं करणारे पुरुष विरळाच.. यातूनच आई वर स्वयंपाकाचा सगळा भार येतो... तिला ब्रेक मिळावा म्हणून हॉटेल मध्ये जाणं हे योग्यच. पण एकाच व्यक्तीवर सगळा भार टाकणं, हाच मुळात फार चुकीचा पायंडा आहे. हॉटेलवर अवलंबून राहण्यामागचं हे एक खूप महत्वाचं कारण म्हणता येईल. 

उपाय: स्त्री अथवा पुरुष,  कोणीही असो..  घरच्या प्रत्येक व्यक्तीला स्वयंपाक हा आलाच पाहिजे. नुसता वेळ मारून नेण्यापुरता येऊन चालणार नाही. स्वतःला एखाद्या महिन्याभरात जे काही वेगवेगळे पदार्थ खायला लागतात (भात - पोळी - भाजी - आमटी - वडे-भजी - श्रीखंड - नॉन वेज), ते सगळे करता यायला हवेत. या एका गोष्टीतून, बऱ्याच प्रमाणात हॉटेलिंग - आणि हॉटेल वरचा अवलंब कमी होईल. 

ते कसं काय ? 

खालील फायदे बघवेत: 

फायदा १: स्वयंपाकाचा भार सर्व सदस्यांमध्ये वाटला जाईल. 

फायदा २: वेगवेगळ्या चवी खायला मिळाल्यामुळे पदार्थांचा कंटाळा येणार नाही

फायदा ३: स्वयंपाक येणं हि एक जीवनावश्यक कला आहे. जसे चालणे -धावणे -पोहणे महत्वाचे तसेच, स्वतःचे अन्न शिजवता येणे, हे आलेच पाहिजे. 

माझं तर मत असं आहे, कि स्वयंपाक हा शाळेतल्या अभ्यासक्रमात असायला हरकत नाही. अन्न वस्त्र निवाऱ्या मध्ये नुसतं समोर अन्न -धान्य असून काय उपयोग - ते खाण्यायोग्य करता येणं हे अन्न मिळण्याइतकेच महत्वाचे.

२. घरातले आणि बाहेरचे पदार्थ यातला फरक: आपल्या खाद्य संस्कृतीत काही पदार्थ हे फक्त बाहेरच मिळतात. ते घरी केलेच जात नाहीत. घरची भेळ कधीच रस्त्यावरच्या स्टॉल वरच्या सरखी लागत नाही. घरी केलेला डोसा कायम वेगळा लागतो.. खरतर घरचे पदार्थ बहेरच्यापेक्शा चंगले लगायला हवेत.. पण तसं होत नाही.. 

उपाय: प्रयत्नपूर्वक हे सगळे पदार्थ घरी कसे करावे ते शिकावं लागेल. (मी बराच सराव करून जवळपास सगळाच स्वयपाक करायला शिकलो. पण अजूनही पाव भाजी रस्त्यावरची असते तशी जमली नाही - प्रयत्न चालू आहेत.).. मी ज्या देशात राहतो, तिथल्या खद्यसंस्क्रुतीत घरचे अणी हॉटेल मधले पदार्थ सहसा सर्खेच लागतात.. बहुदा इथल्या लोकांनी सगळ्या पाककृती घरा घरात पोचवल्या... चवीन् मधली तफावत कमी केली ... 

खरंच असं झालं तर ? 

बघू जमतंय का !! 

धन्यवाद 
अमेय गोखले